मुलींचे लग्नासाठीचे वय १८ हुन २१ वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडणार: रवींद्र चव्हाण
१२ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आता सरळ फाशीची शिक्षा होणार आहे. मुलींचे लग्नासाठीचे वय आता १८ हुन २१ वर्ष करण्याचा प्रस्ताव सरकार मांडणार आहे. अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला खूप मान आहे. स्त्रीचा सन्मान करणं, तिची सुरक्षा करणं, हे एक आदर्श पुरुष असल्याचं लक्षण आहे. त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीचं अनुकरण आज सगळं जग करतंय. सीतामातेच्या रक्षणासाठी रावणाचा वध करणारे प्रभू श्रीराम आपलं दैवत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपल्या लेकी-बहिणींची सुरक्षा करणं, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपलं मोदी सरकारदेखील खंबीर आहे. असं रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत.
भारतातील प्रत्येक मुलीच्या सुरक्षित आयुष्यासाठी आपलं मोदी सरकार सक्षम आहे. १२ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आता थेट फाशीची शिक्षा होणार आहे. मोदी सरकारच्या काळात आपल्या लेकी-बहिणी सुरक्षित होत आहेत, याचा सार्थ अभिमान आहे.#Maharashtra #BJP pic.twitter.com/PycImcaUL9
— Ravindra Chavan (@DombivlikarRavi) January 11, 2023
हेही वाचा – HBD Rahul Dravid: राहुल द्रविडला भारतीय क्रिकेटची ‘वॉल’ का म्हटलं जातं? जाणून घ्या
देशातील प्रत्येक वयोगटातील महिलेच्या सुरक्षा आणि सक्षमतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सरकारनं आजवर अशा अनेक योजना, उपक्रम राबवले आहेत. आपल्या सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांपैकी हा एक महत्वाचा निर्णय आहे. ज्यामुळे देशातली प्रत्येक महिला सुरक्षित होणार आहे, याचा एक देशवासी म्हणून अभिमान आहे. असं रवींद्र चव्हाण म्हणाले.