मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात ८९९२८ मतदार; १३९ मतदान केंद्र
मुंबई: भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात पुरुष मतदार- 53041, महिला मतदार -36882 , 5- तृतीयपंथी असे एकूण 89928 मतदार आहेत.
मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी सहा. मतदान केंद्रासह 139 मतदान केंद्र आहेत. मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी 153- मतदान केंद्राध्यक्ष, 153- प्रथम मतदान अधिकारी (PRO), 306- इतर मतदान अधिकारी,153- शिपाई असे एकूण 765 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.