World Cup 2023: 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पुन्हा भंगले, ऑस्ट्रेलियाने 6व्यांदा ट्रॉफी जिंकली
वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. भारताने दिलेले 241 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 137 धावांची खेळी खेळली. हेडने आपल्या खेळीत 15 चौकार आणि 4 षटकार मारले.
याशिवाय मार्नस लाबुसेनने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. सुरुवातीचे 3 विकेट झटपट पडल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने केवळ डाव सांभाळला नाही तर संघाला विजय मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय मोहम्मद शमीने एक विकेट आपल्या नावावर केली.
1987 🏆 1999 🏆 2003 🏆 2007 🏆 2015 🏆 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ 🏆
𝙰𝚄𝚂𝚃𝚁𝙰𝙻𝙸𝙰 𝙰𝚁𝙴 #𝙲𝚆𝙲𝟸𝟹 𝙲𝙷𝙰𝙼𝙿𝙸𝙾𝙽𝚂 🎉 pic.twitter.com/QtzBty5Ewl
— ICC (@ICC) November 19, 2023
भारताने 240 धावा केल्या होत्या
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जे पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध झाले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत 240 धावा केल्या. या विश्वचषकात टीम इंडिया पहिल्यांदाच ऑलआऊट झाली आहे. भारताकडून फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची तर विराट कोहलीने सर्वाधिक 54 धावांची खेळी खेळली. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने 47 धावांची तर सूर्यकुमार यादवने 18 धावांची खेळी खेळली.
ऑस्ट्रेलियाने शानदार गोलंदाजी केली
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात कांगारू गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फारसे हात उघडण्याची संधीही दिली नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले. कर्णधार पॅट कमिन्सनेही शानदार गोलंदाजी केली. कमिन्सने 10 षटकात केवळ 34 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने 1-1 विकेट घेतली.