भारतीय लष्कराची गाडी दरीत कोसळली, 9 जवान शहीद
लडाख: कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर एक अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय लष्कराच्या 9 जवानांना प्राण गमवावे लागले. त्यांचे वाहन दरीत पडल्याने हा अपघात झाला. या घटनेत आणखी एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लडाखच्या संरक्षण अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सैन्य लेहजवळील कारू चौकीतून कायरीकडे जात होते. या अपघातात अनेक जवान जखमीही झाले आहेत.
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कायरीच्या 7 किमी आधी वाहन संध्याकाळी 5:45 ते 6:00 च्या दरम्यान दरीत पडले. ते म्हणाले, ‘लेहहून न्योमाकडे जाणाऱ्या ताफ्याचा एक एएलएस वाहन संध्याकाळच्या सुमारास कियारीच्या 7 किमी आधी दरीत कोसळले. वाहनात 10 जवान होते, त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आणि एक जखमी झाला. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक
लेहचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पीडी नित्या यांनी सांगितले की, 10 सैनिकांना घेऊन लष्कराचे वाहन लेहहून न्योमाकडे जात होते. वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते दरीत कोसळले, असे त्यांनी सांगितले. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमी सैनिकांना आर्मी मेडिकल युनिटमध्ये नेण्यात आले जेथे 8 जवानांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले. आणखी एका जवानावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
Saddened by the loss of Indian Army personnel due to an accident near Leh in Ladakh. We will never forget their exemplary service to our nation. My thoughts are with the bereaved families. The injured personnel have been rushed to the Field Hospital. Praying for their speedy…
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 19, 2023
लडाखमध्ये झालेल्या अपघातात लष्कराच्या जवानांच्या मृत्यूबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने दु:ख झाले आहे. त्यांनी आमच्या देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. जखमी जवानाला फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लेह, लडाख येथे झालेल्या भीषण अपघातात लष्कराच्या नऊ जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त केला. राष्ट्रपती म्हणाले की, लेहमध्ये एका रस्ता अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला हे जाणून अतिशय दुःख झाले.
Deeply anguished to learn that a road accident in Leh led to loss of lives of Indian Army personnel. I convey my heartfelt condolences to the bereaved families. May God give them strength to bear this tragedy. I pray for the speedy recovery of the injured. The nation owes a great…
— President of India (@rashtrapatibhvn) August 19, 2023
लेहजवळ झालेल्या दुर्घटनेने दु:ख झाले, ज्यात आम्ही भारतीय लष्कराचे जवान गमावले, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सांगितले. त्यांची देशासाठी केलेली भरीव सेवा सदैव स्मरणात राहील.
Pained by the mishap near Leh in which we have lost personnel of the Indian Army. Their rich service to the nation will always be remembered. Condolences to the bereaved families. May those who are injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 19, 2023
एप्रिलमध्ये झालेल्या अपघातात 2 जवानांचा मृत्यू झाला होता
एप्रिल 2023 मध्ये जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्कराची रुग्णवाहिका 200 फूट खोल दरीत पडली होती. या अपघातात 2 जवान शहीद झाले होते.