महसूल सप्ताहांतर्गत कोकण विभागाची अव्वल कामगिरी
नवी मुंबई :- महसूल सप्ताहादरम्यान कोकण विभागात 7 महसूल सहाय्यक व 21 तलाठयांना अनुकंपातत्तावर नियुक्तीपत्र देण्यात आले असून, 5 हजार 721 उत्पन्नाचे दाखले, 1 हजार 889 राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, 1 हजार 631 जातप्रमाणपत्र आणि 8 हजार 850 खरीप हंगामातील पीक विमा दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताहात डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाने अव्वल काम केले आहे.
कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी महसूल सप्ताह यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांपासून इतर सर्व यंत्रणांना विशेष सुचना दिल्या होत्या. या सप्ताहात कोकण विभागातील जास्तीत जास्त नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, नैसर्गिक आपत्ती काळातील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले या महसूल सप्ताहा दरम्यान एकाच ठिकाणी सहजतेने प्राप्त व्हावे यासाठी आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी संपूर्ण विभागात सुक्ष्म नियोजन केले होते. या संपूर्ण सप्ताहादरम्यान आयुक्तांनी स्वत: प्रत्येक जिल्हयातील विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला. तसेच आयोजित केलेली शिबीरे व कार्यशाळांना उपस्थित राहून सुचनाही दिल्या. आयुक्तांच्या या संवेदनशिलतेमुळे या महसूल सप्ताहाला कोकण विभागातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. नागरिक, वृध्द, विद्यार्थी, माजी सैनिक, सिनिकांचे कुटूंबिय, नैसर्गिक आपत्तीग्रस्त यांनी मोठया संख्येने या महसूल सप्ताहात लाभ घेतला अहे.
महसूल सप्ताहात आयोजित विविध उपक्रमांतर्गत कोकण विभागातील नागरिकांना 5 हजार 721 उत्पन्नाचे दाखले, 1 हजार 889 वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, 1 हजार 784 नॉन क्रिमिलेयर, 1 हजार 631 जात प्रमाणपत्र, 855 इतर दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. दाखल्यांबाबत 4 हजार 626 माहितीपत्रके वितरीत करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्तीबाबत 5 हजार 095 माहितीपत्रकांचे वाटप, 273 इ-सेवा केंद्र शाळा, महाविद्यालयांमार्फत आधार कार्ड/वेळा पत्रक शिबीर, 56 गुणवंत पाल्यांचा सत्कार, 16 उप विभागीय स्तरावर कँपचे आयोजन, 54 अनाथ मुलांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित 506 नागरिकांना मदत वाटप, खरीप हंगामातील 8 हजार 850 पीक विमा दाखल्यांचे वाटप, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित 127 नागरिकांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आहे. विभागातील 96 शाळा व महाविद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या जनजागृतीसाठी मॉकड्रिलचे आयोजन, 53 ठिकाणी ई- पीक, पाहणी, ई-चावडी, ई- मोजणी, ई- प्रणालीचा प्रभावी वापर, महसूल आदालतींचे आयोजन करुन, 168 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जमीनी विषयक नोंदी अद्यावत करण्याकरिता 253 प्राप्त अर्ज निकाली, फेरनोंदीचे 423 अर्ज निकाली काढण्यात आले, आपले सरकार पोर्टल वरील 46 तक्रारींचा निपटारा, गावातील व शेतातील रस्त्यांबाबत प्रलंबित असलेले 29 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. लक्ष्मी योजनेंतर्गत 7/12 सदरील 271 महिलांच्या 100 टक्के नोंदी करण्यात आल्या आहेत. संरक्षण दलातील अधिकारी व सैनिकांना 108 विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. माजी सैनिकांच्या संस्था व संघटनांच्या 38 प्राप्त निवेदनांवर 5 शिबीरांतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. वीर पत्नि यांच्या शासकीय जमीन 8 मागणी प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात आली आहे.