प्रिया बापट पोहोचली कोकणातील ‘या’ गावात , व्हिडिओ केला शेअर
प्रिया बापट ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करते. ती “काकस्पर्श” आणि “आम्ही दोघी” या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यासाठी प्रियाने २०१३ मध्ये स्क्रीन अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. प्रिया बापटने आपल्या करिअरची टीव्ही मालिकेमधून केली होती. प्रिया सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
प्रिया सध्या कोकणातील निसर्गाचा आनंद घेत घेताना दिसत आहे. तिचे कोकणाशी खूप जवळचे नाते आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रियाचे आई बाबा हे मूळचे कोकणातले आहेत. तिने एक व्हिडिओ शेअर करत आपल्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. प्रियाचा हा व्हिडिओ पाहुन कोकणातील तिचे चाहते खुश झाले आहेत. तळ कोकणाची मजा काही औरच आहे अश्या विविध प्रतिकिया तिच्या चाहत्यांनाकडून येत आहेत.
View this post on Instagram
प्रिया बापटने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही शोमधून केली होती. प्रिया बापटने 2000 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून पदार्पण केले. तिने दामिनी, आभाळ माया अशा विविध मालिकांमध्येही काम केले. प्रियाने झी मराठी वाहिनीवरील शो “अधूरी एक कहाणी” मध्ये दुसरी मुख्य भूमिका साकारली आहे. तिने स्टार वन कॉमेडी शो साराभाई व्हर्सेस साराभाई मध्ये एक छोटी भूमिका केली होती. तिने झी मराठी वाहिनीच्या ट्रॅव्हल शो आम्ही ट्रॅव्हलकरच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये देखील काम केले आहे.
View this post on Instagram
टेलिव्हिजनमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर, प्रिया बापटने मराठी चित्रपटांमध्ये प्रवेश केला आणि शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९) चित्रपटाद्वारे अधिक स्टारडम मिळवले. आनंदी आनंद (२०१२) या मराठी चित्रपटात प्रियाने आनंदीची मुख्य भूमिका साकारली होती. प्रियाने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या मुन्नाभाई मालिकांमध्येही कॅमिओ केला आहे. लहानपणी ‘दे धमाल’ या मुलांच्या शोमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.