Vengurla: धक्कादायक! विहीरीत आढळला 31 वर्षीय युवकाचा मृतदेह!!


वेंगुर्ले शहरातील सेंटलुक्स हॉस्पिटलच्या आवारातील विहिरीत रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. साईश सुरेश वेंगुर्लेकर असे त्याचे नाव असून वय 31वर्षे आहे. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. साईशचे घर सेंटलुक्स हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये आहे. मध्यरात्री घराजवळील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या तरुणाचे मानसिक संतुलन बिघडलेले होते असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कमलाकर आपा वेंगुर्लेकर यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव व पोलीस हवा चव्हाण करीत आहेत.