पूर्वतयारी न केल्याने सावंतवाडीतील ४० गावांमधील वीज गायब – अर्चना घारे-परब


कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीची जाणीव असून देखील पावसाळ्यापूर्वी कुठलीही पूर्वतयारी न केल्याने सावंतवाडी परिसरातील सुमारे ४० गावांमधील वीज गायब आहे. याबाबत अर्चना घारे परब यांनी आज महावितरणचे सावंतवाडी उपविभागीय अधिकारी चव्हाण यांची भेट घेत ग्रामस्थांच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या.

सावंतवाडी परिसरातील सुमारे चाळीस गावांमध्ये महावितरणच्या व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून तारा तुटल्या आहेत आणि ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळाली आहेत. या सर्व ठिकाणी आवश्यक दुरुस्ती करून पुन्हा वीज पुरवठा करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ महावितरणकडे नाही. आधीच मुसळधार कोसळणारा पाऊस आणि त्यात गावात लाईट नसणे यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. मोठ्या प्रमाणात पशुधनाचे देखील नुकसान होत आहे. परंतु या परिस्थितीवर मात करण्यासाठी महावितरण मात्र काहीही तयारी केलेली दिसत नाही. या अगोदरच संबंधित पोलचे ऑडिट व्हायला हवे होते. जिथे धोकादायक वृक्ष आहेत त्या ठिकाणी वृक्षांची छाटणी करून यातील बहुतांश नुकसान हे वाचवता आले असते. परंतु त्यावेळी यांनी महावितरण ने काळजी न घेतल्याने आज सर्वांना अंधारात बसण्याची वेळ आली आहे. आज महावितरण कार्यालयास दिलेल्या या भेटीच्या दरम्यान लवकरात लवकर ही परिस्थिती सुधारण्यासाठी मागणी करण्यात आली. अन्यथा आठवडाभरात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहाराध्यक्ष सायली दुभाषी, सरचिटणीस हिदायतुल्ला खान, अल्पसंख्याक सेल महिला अध्यक्षा राबिया शेख-आगा, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर, भालावल गावचे सरपंच समीर परब, दाभिल ग्रामपंचायत मा. सदस्य विष्णू गाडी, हनुमंत जाधव, श्रीकांत कोरगावकर, श्रावणी कोरगावकर, नॉर्बर्ट डिसोजा, अनिल सरमळकर, वैभव परब, विजय मुंडये, तबरेज बेग आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.