राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस
मुंबई : राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान केंद्राने राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. IMD ने सोमवारी मुंबई आणि ठाण्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट
यासोबतच IMD ने रायगड, पालघर आणि कोकण या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर रायगडसाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने या भागातील लोकांना पाऊस आणि पूर यासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व तयारी करण्यास सांगितले आहे.
पावसामुळे नागपूर विभागातील अनेक भागात 875.84 हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.