मुंबईत रेल्वेच्या मदतीला धावली ‘लालपरी’


मुंबई आणि परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्यासाठी एसटीच्या बसेस उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिले, त्या निर्देशानुसार Maharashtra State Road Transport Corporation – MSRTC ने तातडीने कार्यवाही केली आहे.

एस.टी.च्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण अशा महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर १०० पेक्षा जास्त बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. या रेल्वेस्थानकांपासून प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत बसद्वारे मोफत वाहतूक करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहे. कामावरुन घरी निघालेल्या मुंबई परिसरातील चाकरमान्यांना या बससेवेमुळे सुरक्षितपणे, कोणतीही गैरसोय न होता घरी पोहोचणे शक्य झाले आहे.

May be an image of 4 people, trolley, train and text that says 'vivo T1 Pro'