HBD Kapil Dev: कपिल देव यांच्या क्रिकेटच्या खूप गोष्टी ऐकल्या, आज प्रेमकथाही ऐका


जगातील महान अष्टपैलू कपिल देव आज त्यांचा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९८३ मध्ये भारताला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कपिल देव यांच्या क्रिकेटशी संबंधित अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला लॉर्ड्सवर पराभूत करून भारताला विश्वविजेते होण्याचा मान मिळवून दिला. भारतात क्रिकेटला लोकप्रिय करण्यात कपिल देव यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भारताकडून १६ वर्षे (१९७८ -९४) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या कपिल देव यांचा फिटनेसही अप्रतिम होता. कपिल देव यांच्या क्रिकेटशी निगडित अनेक किस्से चाहत्यांना आठवतात, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी लोकांना माहिती नाही.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेमकथेचा एक किस्सा शेअर करत आहे. खुद्द कपिल देव यांनी ही माहिती दिली आहे. २०२० मध्ये जेव्हा कोविड-१९ च्या लाटेने जगात खळबळ माजवली होती, तेव्हा लोकांना सामाजिक अंतर पाळावे लागले आणि ते केवळ संवादाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाऊ शकले. अशा परिस्थितीत कपिल देव यांनीही बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा शोमध्ये भाग घेतला आणि आपल्या रोमँटिक आयुष्यातील एक किस्सा शेअर करून सर्वांना रोमांचित केले.

कपिल देव आणि त्यांची पत्नी रोमी यांचा प्रेमविवाह आहे. यावर नेहा धुपियाने त्यांना येथे प्रश्न विचारला. खरं तर, कपिल देव आणि रोमीच्या प्रपोजवर अनेक बातम्या आहेत की त्याने रोमीला ट्रेनमध्ये फोटो काढण्याच्या बहाण्याने प्रपोज केले होते. मात्र कपिल देव यांनी त्यांना खोटे सांगितले आहे. कपिल देव म्हणाले, ‘मी आणि रोमी मुंबईत गाडी चालवत होतो आणि तेव्हा मला रस्त्यावर एक मजेदार जाहिरात पोस्टर दिसले, जे अमूलचे होते. ते पाहून मी रोमीला म्हणालो की चल फोटो काढून आपल्या मुलांना दाखवू. यावर रोमी म्हणाली तू मला प्रपोज करत आहेस का? मग मी तिला म्हणालो कि हे ऐकून तुला काय वाटत आहे? या संवादानंतर कपिल देव आणि रोमी यांच्या प्रेमकथेला सुरवात झाली.

या जोडप्याचा विवाह १९८० मध्ये झाला होता. यानंतर त्यांनी १९८३ च्या विश्वचषकाचे विजेतेपद भारताला मिळवून दिले आणि जगामध्ये आपले नाव गाजवले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १३१ कसोटी आणि २२४ एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान, त्यांनी कसोटीत ८ शतकांच्या मदतीने ५२४८ धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यात त्यांच्या ३७८३ धावा आहेत, ज्यामध्ये एकमेव शतकाचा समावेश आहे. १९८३ च्या विश्वचषकात टीम इंडिया अडचणीत असतानाच त्यांनी हे शतक झळकावले होते. त्यांनी नाबाद १७५ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय या अष्टपैलू खेळाडूने कसोटीत ४३४ आणि एकदिवसीय सामन्यात २५३ विकेट्स घेतल्या आहेत.