पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
या परीक्षेची सांख्यिकीय माहिती पुढीलप्रमाणे आहे. परीक्षेचे नाव नोंदविलेले विद्यार्थी उपस्थित विद्यार्थी अनुपस्थित विद्यार्थी पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शेकडा निकाल (पात्र विद्यार्थी संस्खेनुसार) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5वी) 532876 514131 18745 114710 16537 22.3115 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) 367802 356031 11771 55558 14714 15.6049 एकूण 900678 870162 30516 170268 31251 19.5674 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. 8 वी ) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल 29 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाच्या अनुषंगाने 29 एप्रिल 2023 ते 9 मे 2023 या कालावधीत संबंधित शाळेमार्फत गुणपडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही तयार करण्यात आली आहे.
या परीक्षेतील मंजूर संच व शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुढालप्रमाणे दिली आहे. अ.क्र संच प्रकार इयत्ता 5 वी इयत्ता 8 वी मंजूर संच प्रत्यक्षात संचधारक विद्यार्थी संख्या मंजूर संच प्रत्यक्षात संचधारक विद्यार्थी संख्या 1 संच E (राष्ट्रीय ग्रामीण ) 340 340 340 340 2 संच J (ग्रामीण सर्वसाधारण) 8124 8014 6650 6331 3 संच K (शहरी सर्वसाधारण) 7863 7829 6430 6393 4 संच F (सर्वसाधारण मुले/ मुली) 243 240 145 123 5 संच G (सर्वसाधारण मुली) 19 17 22 15 6 संच H (मागासवर्गीय मुले/ मुली) 93 87 17 9 7 संच I ( मागासवर्गीय मुली) 11 10 14 3 तालुकास्तरीय शिष्यवृत्ती संच 8 संच A (ग्रामीण सर्वसाधारण) – – 1389 1030 9 संच B ( ग्रामीण अनुसूचित जाती) – – 434 211 10 संच C (ग्रामीण भूमिहीन शेतमजूराचा पाल्य) – – 955 216 11 संच D (ग्रामीण आदिवासी) – – 192 43 एकूण 16693 16537 16588 14714 या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून बघता येणार आहे.
तसेच शाळांना त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे बघता येणार आहे. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येणार आहे. संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीची लिंक पुढीलप्रमाणे आहेत. अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी), गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय) शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय, तालुकानिहाय) विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना लिंकवर क्लिक करून माहिती डाऊनलोड करता येईल.
गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही:- शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी. मान्यताप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी. विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेली विद्यार्थी. गुणपत्रक/ प्रमाणपत्राबाबत:- परिषदेने संकेस्थळावर अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक दि. 29 एप्रिल 2023 रोजी व अंतिम गुणपत्रक दि.13 जुलै 2023 रोजी उपलब्ध करुन दिलेली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र यथावकाश शाळांना पोहोच करण्यात येतील. महत्वाचे:- सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करुन उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुणांवरुन शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकडा गुणांवरुन गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची , खोटी माहिती भरुन शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झालेल्या निदर्शनास आल्यास अशा शाळा प्रमुखांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच अशा विद्यार्थ्यांची अईता रद्द केली जाईल. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्याची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबतचा यापुढील पत्रव्यवहार त्यांचे कार्यालयाकडेच करण्यात यावा. सुलभ संदर्भासाठी पत्ता पुढीलप्रमाणे शिक्षण संचालक (योजना) शिक्षण संचालनालय योजना, 17 डॉ. आंबेडकर रोड, पुणे 411-001 हे प्रसिध्दीपत्रक परिषेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.