कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात; निलेश राणे यांची टीका


अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार गटाची सत्ता आल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

मी अजित पवारांना समर्थन दिलं आहे. मात्र, याचा अर्थ मी भाजपचा प्रचारक असेल किंवा भाजप सत्तेवर जाण्यासाठी मी प्रयत्न करेन असा होतं नाही. असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं होतं. यावर आता निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आत्ताच कुठेतरी वाचलं मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही… हा कोण आहे?? आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात. भलताच कॉन्फिडन्स असतो काही लोकांना. असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.