कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने 18002332686 वर संपर्क साधा


सिंधुदुर्ग : कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्वीकरणे व तक्रारींचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर जिल्हास्तरावर टोल फ्री 18002332686 क्रमांकवर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विभागीय कांदळवन संरक्षण व संवर्धन सनियंत्रण समितीच्या 22 व्या बैठकीतील सूचनांप्रमाणे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांच्याकडी पत्र क्र. मशा/ कार्या-9 कांदळवन संरक्षण 2023 दि. 30 जून 2023 च्या पत्रान्वये कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी 18002332686 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा