राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या


जेजुरी (पुरंदर) येथील माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. या खुनात पाच ते सहा आरोपींचा सहभाग असून रात्री उशिरापर्यंत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी व इतर पाच जणांवर पोलिसांकनी गुन्हा दाखल केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबुब पानसरे यांची कोयता आणि कुऱ्हाडीच्या मदतीने शुक्रवारी सायंकाळी हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.