धक्कादायक! सिंधुदुर्गात वेश्या व्यवसाय, ३ महिलांना अटक
वेंगुर्ले : पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू जुगारासारख्या अनैतिक धंद्यांसोबतच वेश्याव्यवसायही सुरू असल्याचे वेंगुर्ले येथील आजच्या कारवाईत उघड झाले आहे. वेंगुर्ले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकासह आजगाव येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला.
तपासादरम्यान पोलिसांना आरोपीसह तीन महिला तेथे वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तीन महिलांसह चौघांनाही ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील कारवाई सुरू केली आहे.