Sindhudurg Anganwadi Bharti सिंधुदुर्गात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती, लगेच करा अर्ज
सिंधुदुर्ग : महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग जि.रत्नागिरी प्रकल्पांतील 38 रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांची, मानधनी तत्वावर भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक महिला उमेदवारांनी दि. 19 जुलै 2023 रोजी सायं.6.15 पर्यंत अर्ज कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्गचे बाल विकास प्रकल्प अधिकारी आर.बी. काटकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, मावलवण- देऊळवाडा, रेवतळे जि.प. वेंगुर्ला- वेंगुर्ला शाळा नं-3. कणकवली – कणकवली शाळा नं5. कुडाळ – विठ्ठलवाडी, गणेश नगर, पडतेवाडी. दोडामार्ग- शाळा नं.1 देवगड- सडा, जामसंडे टापू, शांतीनगर, टिळक नगर, वडांबा, वेळवाडी, तुळशीनगर, कावळेवाडी, अशा 16 अंगणवाडीकरिता नागरी क्षेत्रातील महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रकल्पाच्या नागरी क्षेत्राबाहेरील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच अपात्र उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील व त्याबाबत त्यांना कोणत्याही स्वरुपात लेखी कळविण्यात येणार नाही.
जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसांच्या आत अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात शासकीय सुट्टी सोडून सादर करावेत. आवश्यक पात्रता- वय 18 ते 35 वर्षे (विधवा उमेदवार वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे) शिक्षण- किमान 12 वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा अधिक, शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील. अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती बाबत http://sindhudurg.gov.in व http://sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.