माछिल सेक्टरमध्ये ऑपरेशनल टास्क दरम्यान लष्कराचे 3 जवान शहिद


कुपवाडा उत्तर काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ऑपरेशनल टास्क दरम्यान लष्कराचे तीन जवान खोल दरीत पडले. या अपघातात तिन्ही जवान शहीद झाले. तिन्ही जवानांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या तीन जवानांमध्ये ०१ ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर आणि ०२ OR इतर यांचा समावेश आहे. ज्या भागात हे जवान दरीत पडले तो भाग बर्फाच्छादित असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेबाबत लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेसीओ आणि इतर दोन जवान माछिल सेक्टरमध्ये नियमित गस्त घालत होते. दरम्यान ते दरीत पडले. श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, नियमित ऑपरेशन दरम्यान एक JCO आणि इतर दोन जवानांची टीम हिमवृष्टीमुळे खोल दरीत पडले.

हेही वाचा – मुलींचे लग्नासाठीचे वय १८ हुन २१ वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडणार: रवींद्र चव्हाण

यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्येही येथे अशीच एक घटना घडली होती. कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये जेव्हा जेव्हा हिमस्खलन होते तेव्हा लष्कराचे तीन जवान शहीद झाले होते. नोव्हेंबर २०२२ च्या घटनेत शहीद झालेल्या तीन जवानांची नावे सौविक हाजरा, मुकेश कुमार आणि मनोज लक्ष्मण राव अशी आहेत. कुपवाडा हा भारत-पाक सीमेवरील नियंत्रण रेषेला लागून असलेला भाग आहे.येथे बर्फाच्छादित शिखरांवर लष्कराचे जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात असतात.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा