टीम इंडिया 2023 मध्ये खेळणार 50 हून अधिक सामने, सर्वाधिक सामने ‘या’ देशाविरुद्ध
नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि संपूर्ण देश आज त्याच्या उत्सवात मग्न आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने २०२३ साठी पूर्ण तयारी केली आहे. भारतीय संघासाठी हे वर्ष खूप व्यस्त असणार आहे. भारतीय संघाला यावर्षी दोन मोठ्या स्पर्धा तसेच अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत. याशिवाय भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचाही सामना करायचा आहे. जाणून घेऊया टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक (Team India 2023 Schedule).
टीम इंडियाला यावर्षी अनेक देशांसोबत द्विपक्षीय मालिका खेळायची आहे. भारतीय संघ २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, आशिया कप तसेच ८ कसोटी, १८ एकदिवसीय आणि १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. याशिवाय, जर संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर त्याला आणखी एक कसोटी सामना खेळावा लागेल. त्याच वेळी, या सर्व सामन्यांव्यतिरिक्त, आयपीएल २०२३ मार्च ते जून दरम्यान खेळले जाईल. मात्र, त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. जानेवारीमध्ये भारत आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंका भारतात येत आहे. श्रीलंकेचा भारत दौरा ३ जानेवारीपासून टी-२० सामन्यांनी सुरू होणार आहे. चला तर मग एक नजर टाकूया टीम इंडियाच्या संपूर्ण वेळापत्रकावर.
टीम इंडियाचे २०२३ चे पूर्ण वेळापत्रक
टीम इंडियाचे २०२३ वर्षाचे संपूर्ण वेळापत्रक | |
३ जानेवारी ते १५ जानेवारी | तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी श्रीलंका भारत दौऱ्यावर आहे |
१८ जानेवारी ते १ फेब्रुवारी | न्यूझीलंडचा संघ तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी भारतात येणार आहे |
९ फेब्रुवारी ते २२ मार्च | भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी आणि तीन वनडे सामने होणार |
एप्रिल-मे | आयपीएल २०२३ |
जून | WTC फायनल २०२३ (जर भारत WTC फायनलसाठी पात्र ठरला) |
जुलै-ऑगस्ट | भारत २ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांसाठी वेस्ट इंडिजला जाणार आहे |
सप्टेंबर | आशिया कप २०२३ |
सप्टेंबर | ऑस्ट्रेलियन संघ तीन एकदिवसीय मालिकेसाठी भारतात येणार आहे |
ऑक्टोबर १० – नोव्हेंबर २६ | २०२३ एकदिवसीय विश्वचषक |
नोव्हेंबर-डिसेंबर | भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (कांगारू संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी येणार) |
डिसेंबर | डिसेंबरच्या अखेरीस, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल, जिथे त्यांना २ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. |